Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा

team by team
August 13, 2021
in कृषी
0
माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा

राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ऍपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ई-पीक पाहणी कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून येत्या १५ ऑगस्टपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्यादृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत शेतकर्‍यांचा सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे. या आज्ञावलीचा उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे.करंजपाडा येथे प्रायोगिक तत्वावर यशस्विरित्या करण्यात आला आला असून ई-पीक पाहणी प्रकल्पापूर्वी राज्यातील २० तालुक्यांमध्ये या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ई-पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे.आणि तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होईल. पच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल प्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणार्‍या पिकांच्या छायाचित्रासह उपलब्ध होऊ शकेल. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.
ई-पीक पाहणीचे फायदे-
शेतकर्‍यांना देय असणार्‍या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे शक्य होणार आहे.
खातेनिहाय आणि पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शेतकर्‍याकडून देय ठरणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येईल. खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भारपाई शक्य होणार आहे. कृषि गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या करता येईल.
ई-पीक पाहणीचे टप्पे आणि कालावधी-
ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल. १५ सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल. १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान मोबाईल पमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठी ती कायम करतील. खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मधील गाव नमुना नंबर १२ मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. १ ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात.
एका मोबाईलवरून २० खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकर्‍याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा र्स्माटफोन वापरता येईल. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
ई-पीक पाहणीमुळे शेतकर्‍यांना विविध सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याने आणि ही प्रक्रीया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकर्‍याला यात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने आवश्यक प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी या प्रणालीची माहिती घेतल्यास येत्या काळात त्याला ई-पीक पाहणी उपयुक्त ठरू शकेल. –जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार.

 

बातमी शेअर करा
Previous Post

भाडेतत्वावर वाहनासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

Next Post

नंदुरबार जिल्हृयात मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा सिनेमा हॉल्स, नाट्यगृह व धार्मिक स्थळे बंद: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Next Post
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

नंदुरबार जिल्हृयात मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा सिनेमा हॉल्स, नाट्यगृह व धार्मिक स्थळे बंद: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add