Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समृद्ध गाव स्पर्धेतील विजेत्या गावांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान

team by team
August 13, 2021
in सामाजिक
0
समृद्ध गाव स्पर्धेतील विजेत्या गावांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात  आला सन्मान

नंदुरबार | प्रतिनिधी
पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा-२०२०-२०२२ च्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करणार्‍या गावांचा सन्मान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले, कृषि तंत्रज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, उमेद अभियानाचे किशोर जगदाळे आदी उपस्थित होते.
समृद्ध गाव स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून श्रीमती खत्री म्हणाल्या, जलसंधारणाचे काम केवळ स्पर्धेपुरते मर्यादीत न ठेवता गावाच्या विकासासाठी त्यात निरंतरता ठेवावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे घेण्यात यावी. विहीर पुनर्भरणासारखे उपक्रम हाती घेण्यात यावे. या कामांमुळे शेतकर्‍यांना आणि एकूणच गावाला फायदा होण्यासोबत गावातील वातावरणही सकारात्मक होते. स्पर्धेत सहभागी होणार्‍या गावांनी गाव समृद्ध करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री.मोरे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून मृदा संधारण, जलसंधारण आणि वायू प्रदूषण कमी करण्याचे काम होत असल्याने या स्पर्धेतील सहभाग महत्वाचा आहे. वृक्षारोपणामुळे गावाला फायदा होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगली कामे करता येतील.
जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करणार्‍या दामळदा, लंगडी भवानी, लोंढरे, अंबापूर, फेस, हिंगणी, गोगापूर, कोळपांढरी, कवठळ त.श., भुलाणे, पाडळदा बु., नागझिरी, वीरपूर, नवानगर, कलसाडी, मानमोड्या, काकर्दे खु., जवखेडा, धांद्रे खु. कानडी त.श. या गावांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यत आले. बामखेडा त.त., जाम, जयनगर आणि आडगावला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. जलमंदिर, ग्रीकल्चर टीम आणि उज्वला पाटील यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला कृषि सहायक, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

१५ दिवसांपासून रजाळे रस्त्यावर झाड पडून; संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत

Next Post

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add