नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर व मोठे उदेपूर परिसरात जोरदार वादळामुळे अतोनात नुकसान झाले असून सदर नुकसानाची पाहणी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी केली असून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना भरपाई देण्याचे सुचित केले.
दि.२७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक जोरदार उद्भवलेल्या वादळवाऱ्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील खापर परिसरात असलेल्या गुलीउंबर, छोटे उदेपूर तसेच अंकलेश्वर ब-हाणपुर महामार्गावरील हॉटेल्स व्यावसायिकांचे वादळामुळे नुकसान होऊन पत्रे व भिंतीची पडझड, तसेच मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही .अचानक आलेल्या वादळामुळे विजेचे खांब कोसळले असुन घटनास्थळावरुनच आमदार आमश्या पाडवी यांनी विज वितरण अभियंता यांना सुचना देऊन ताबडतोब विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आदेश दिलेत .
नुकसानीचे पंचनामा करण्यासंदर्भात अक्कलकुवा तहसीलदार सचिन म्हस्के यांच्याशी संपर्क करुन सुचना दिल्यात यावेळी पंचायत समिती सदस्य नानसिंग वसावे, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाडवी, युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट, तालुका प्रमुख मगन वसावे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मगन वसावे, जी. डि. पाडवी, तुकाराम वळवी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरव, कान्हा दादा नाईक,तालुका उपप्रमुख नटवर पाडवी तसेच नुकसान ग्रस्त नागरिक उपस्थित होते.