Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काकर्दे विकासोवर भाजपा पुरस्कृत विकास पॅनलचे सर्वच उमेदवार बिनविरोध

team by team
May 31, 2022
in राजकीय
0
काकर्दे विकासोवर भाजपा पुरस्कृत विकास पॅनलचे सर्वच उमेदवार बिनविरोध

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील काकर्दे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली. या सोसायटीच्या चेअरमनपदी राजहंस हिरामण माळी यांची सलग तिसर्‍यांदा बिनविरोध निवड झाली. तर व्हाईस चेअरमनपदी शांतीलाल शंकर मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नंदुरबार तालुक्यातील काकर्दे विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच घेण्यात आली. या निवडणूकीत आ.डॉ.विजयकुमार गावित यांचे भाजपा पुरस्कृत विकास पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले. त्यानंतर काकर्दे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विकासोच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली.

यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. काकर्दे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजहंस हिरामण माळी यांची सलग तिसर्‍यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तसेच व्हाईस चेअरमनपदी शांतीलाल शंकर मराठे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म.श.महाजन यांनी निवड घोषित केली. त्यांना सोसायटीचे सचिव रफिक शेख यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य गुलाब लक्ष्मण खलाणे, कन्हैय्यालाल भटू माळी, देविदास रामदास माळी, धनराज शंकर माळी,

भावराव राघो माळी, महादु तुकाराम माळी, पुंजू सिताराम मराठे, कांतीलाल सदु भिल, हिराबाई राजहंस माळी, सरलाबाई राजेंद्र माळी तसेच दत्तात्रय खलाणे, भटु माळी, युवराज माळी, रविंद्र माळी, राकेश माळी, भाईदास भिल, भावराव माळी, हरीचंद्र माळी, नरेंद्र माळी, दिपक वाघ, संतोष माळी, भटु बेंद्रे, शांतीलाल माळी, कल्पेश माळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वावद विकासोवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 13 पैकी 10 उमेदवार विजयी

Next Post

प्रधानमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद, नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

October 2, 2026
डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

October 2, 2026
सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add