नंदुरबार l प्रतिनिधी
वावद ता जि नंदुरबार येथील विविध कार्यकारी सोसायटी यांचे पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला असून 13 पैकी 10 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.
यावेळी चेअरमनपदी रोहिदास मोहन भिल व व्हा चेअरमन बन्सीलाल भाईदास पाटील ( मा सरपंच वावद ) यांची निवड करण्यात आली.
तसेच सर्व निवडुन आलेल्या सर्व सदस्य यांना सयाजीराव मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण (मुन्ना )पाटील,
शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गिरासे, नंदुरबार पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.








