तळोदा ! प्रतिनिधी
तळोदा येथे श्री.संत सावता माळी युवा मंच तर्फे शनिवारी (ता. ७) रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १११ दात्यांनी रक्तदान करुन सदर शिबीर यशस्वी केले. दरम्यान श्री.संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत गेल्या सहा वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असून या सहा वर्षात तब्बल १ हजार ५५३ दात्यांनी रक्तदान केले आहे.
श्री.संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत तळोद्यातील श्री. संत सावता माळी युवा मंच तर्फे शनिवारी (ता. ७) रोजी येथील माळी समाज मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात माळी समाज बांधवांबरोबरच इतर समाज बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. तसेच महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने रक्तदान केले. यावेळी अनेक दांपत्यांनी सोबत येत रक्तदान केले. या शिबिरात एकूण १११ दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी समस्त माळी समाज पंचाचे अध्यक्ष अरविंद मगरे , उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी , सचिव उखा पिंपरें सदस्य ईश्वर मगरे , भगवान मगरे , बालू राणे , संतोष कर्णकार , सुनील सूर्यवंशी , अनिल मगरे , शिरीष माळी , अरुण मगरे , अतुल सूर्यवंशी , राजेश माळी , लक्ष्मण सागर , सुरेश चव्हाण , किरण राणे , अरुण कर्णकार , अजित टवाळे , शशिकांत सूर्यवंशी , किरण सूर्यवंशी तसेच माळी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती टवाळे , सचिव कल्पना राजकुळे , सदस्य वंदना सूर्यवंशी , अनिता टवाळे , हेमलता पिंपरे , वनिता राणे , सुनंदा माळी , रमीला पिंपरे , मिनाक्षी मगरे , लिना शेंडे व लता चव्हाण आदी उपस्थित होते .
रक्त संकलित करण्यासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकचे डॉ.सुनील चौधरी, रक्तपेढी तंत्रज्ञ रोहिदास जाधव, चंद्रकांत दंडगव्हाण, गजानन चौधरी कैलास पाटील, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ब्लड बँके कडून प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्तीपत्र देण्यात आले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माळी समाज बांधवांनी विशेषतः युवकांनी तसेच माळी समाज पंच मंडळ, माळी समाज महिला मंडळ, श्री.संत सावता माळी युवा मंच आदींनी परिश्रम घेतले.
सहा वर्षात तब्बल १ हजार ५५३ दात्यांचे रक्तदान : तळोदा येथील श्री.संत सावता माळी युवा मंचाकडून २०१५पासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असून पहिल्या वर्षी २२३ दात्यांनी, २०१६ मध्ये २९४ दात्यांनी, २०१७ मध्ये ३३६ दात्यांनी, २०१८ मध्ये ३०३ दात्यांनी, २०१९ मध्ये २८६ दात्यांनी तर यावर्षी १११ दात्यांनी रक्तदान केले. श्री.संत सावता माळी युवा मंचाकडून आयोजित रक्तदान शिबिरात सहा वर्षात एकूण तब्बल १ हजार ५५३ दात्यांनी रक्तदान केले आहे.