Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग

team by team
April 27, 2022
in राज्य
0
प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग

नंदूरबार l प्रतिनिधी
येथील जी. टी .पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. माधव कदम यांनी नुकतेच उदगीर येथे संपन्न झालेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘सीमावर्ती भागातील निमंत्रित कवी’ संमेलनात आपला सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उदयगीरी महाविद्यालय व अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात गुजरात व मध्य प्रदेश लगतच्या सीमावर्ती भागातील नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापक डॉ. माधव कदम यांची सीमावर्ती भागातील निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली होती. संमेलनाच्या कवि विभागात सीमावर्ती भागातून नंदुरबार मधून ते एकमेव निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाले होते. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे संमेलनाचे अध्यक्ष होते. तर राज्यमंत्री संतोष बनसोडे स्वागताध्यक्ष होते. निमंत्रित कवींच्या काव्यवाचन समारंभासाठी लक्ष्मण लच्छमन्ना हे अध्यक्ष होते .डॉ. माधव कदम यांनी आपली “वावर “ही कविता कवी संमेलनात सादर केली. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मानधन देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगांव, धुळे-नंदूरबार चे पदाधिकारी व मार्गदर्शक माजी प्राचार्य तानसेन जगताप,जेष्ठ प्राध्यापिका डॉ.शशिकला पवार मॅडम यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू, प्रकल्पग्रस्तांनी कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये: पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

Next Post

नवापूर तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामना सुरुवात नसतांना बिले सादर, जि.प.चे संबंधित अधिकारी व ठेकेदार संगनमताने करतात भ्रष्टाचार : जि.प.सदस्य भरत गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add