Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंगणवाडी सेविका भरतीत वयाच्या अटीत शिथिलता देण्याची मागणी

team by team
June 23, 2021
in शैक्षणिक
0
अंगणवाडी सेविका भरतीत वयाच्या अटीत शिथिलता देण्याची मागणी
तळोदा । प्रतिनिधी
 अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेतील वयाच्या अटीत शिथिलता मिळणे बाबतचे मागणीचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
     या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार तर्फे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सर्व जिल्हास्तरावर कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आपल्या नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला सुरुवात झालीे असून नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याकारणाने अनेक इच्छुक पात्र महिला बेरोजगार असून नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अंगणवाडी भरती प्रक्रियामध्ये अनेक महिलांना रोजगार मिळणार आहे. परंतु काही महिला भरती प्रक्रियेपासून वंचित आहेत. हा त्यांच्यावर अन्याय आहे. कारण तळोदा तालुक्यात साधारण मागील सन २०१७-१८ नंतर तब्बल चार वर्षा नंतर आत्ताच भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०१७ – १८ नंतर लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा वेगवेगळ्या कारणांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. तसेच कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमुळे भरती प्रक्रिया थांबली होती. यामुळे अनेक इच्छुक पात्र महिलांचे वय तब्बल चार वर्षानी वाढले आहे. त्यामुळे सदरील महिलांवर अन्याय होत असल्याने वयामध्ये शिथिलता देऊन त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
        निवेदन देतेवेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे नंदुरबार जिल्हा प्रवक्ता गणपत पाडवी, मुकेश पाडवी, सुरेश पाडवी, दीपक वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जा बाबत आढावा बैठक

Next Post

सानेगुरूजी मित्र मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
सानेगुरूजी मित्र मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सानेगुरूजी मित्र मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add