नंदुरबार ! प्रतिनिधी
पंजाब संगुर येथे 19 व्या नॅशनल फेडरेशन कप कनिष्ठ ( U – 20 ) 2021 मध्ये 3 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत राजबर्डी अंतर्गत येणाऱ्या खर्डी बुद्रूक येथील कु.रिंकी धन्या पावरा हिने सिल्व्हर पदक पटकाविले आहे .
नंदुरबार जिल्ह्यातील राजबर्डी अंतर्गत असलेल्या खर्डी बु.येथील व अनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता 12 वीची विद्यार्थिनी कुमारी रिंकू धन्या पावरा हिने 19 व्या नॅशनल फेडरेशन कप कनिष्ठ ( U – 20 ) अथलेटिकस चॅपियनशिप 2021 संगुर पंजाब येथे 3 हजार मीटर धावण्याच्या सिल्व्हर मेडल पटकाविले आहे.यशाबद्दल प्राचार्य आरती पावरा , प्राथमिक मुख्याध्यापक व्ही . आर . पटले व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे .