नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
त्वरित पदे भरण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आ. डॉ.विजयकुमार गावित यांनी अर्थ संकल्पिय अधिवेशनात केली.
नंदुरबार जिल्ह्याचे नेते आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी अर्थ संकल्पिय अधिवेशनात नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
त्वरित पदा संदर्भात प्रश्न उपस्थित केला.त्यात त्यांनी म्हटले की, नंदूरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे.नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम वर्ष सुरू आहे आणि आता दुसरे वर्ष एमबीबीएसचे सुरू होणार आहे.त्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलने इन्स्पेक्शन केले असून त्याच्यात असे आढळून आले की द्वितीय एमबीबीएसची एकही पदे अजून भरलेली नाहीत.मागील प्रथम एमबीबीएस ला एकही पद परमानंट नसून सर्व डेप्युटेशनवर होती त्यामुळे मेडिकल कौन्सिलने नोटीस दिली आहे. त्या नोटिशीमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की तुम्ही ही पदे भरलेली नाहीत आणि जर तुम्ही ती पदे भरली नाहीत तर तुम्हाला द्वितीय एमबीबीएस वर्षात प्रवेश मिळणार नाही तरी नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्वरित पदे भरण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आ. डॉ.विजयकुमार गावित यांनी अर्थ संकल्पिय अधिवेशनात केली.








