नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील युवक संतोष वाघ उर्फ बब्बू आपल्या घराच्या हाकेच्या अंतरावर टँकरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नवापूर शहरा लगत गुजरात राज्यात उच्छल येथे वास्तव्यास असलेले संतोष वाघ नवापूर बेडकी येथे खाजगी ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामाला होते.शनिवारी रात्री आपल्या खाजगी कामानिमित्त नवापूर शहरातुन आपल्या उच्छल निवास स्थानी जात असताना घराचा अगदी जवळ हाकेच्या अंतरावर त्यांच्या हिरो कंपनीच्या दुचाकीला ( क्र.एम.एच.39, के.5501) ला टँकर (क्र.एम.पी.09, एच.जी.0966) ने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या आकस्मिक घटनेने संतोष वाघ यांच्या नवापूर शहरातील मित्र परिवारात शोकमय वातावरण दिसून आले. त्याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी उच्छल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.यावेळी रुग्णालयात नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने गोळा झाले होते.