Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयातील कृषिदूताची शेतकर्‍यांमध्ये जनजागृती

team by team
July 24, 2021
in कृषी
0
शहादा येथील के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयातील कृषिदूताची शेतकर्‍यांमध्ये जनजागृती

तळोदा | प्रतिनिधी
 महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालय शहादा येथील कृषिदूत दि.५ जुलै पासून गावोगावी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहेत.
           कृषिदूत हे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले मोहम्मद अब्दुलहुसेन बद्री यांनी तळोदा तालुक्यातील रोझवा येथे शेत शिवारात जावून शेतकऱ्यांना पीक पद्धती व वित्त पुरवठा याबाबत माहिती दिली. आधुनिक पीक लागवड पद्धती व शेतीला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. शेतीसाठी उपयुक्त असलेले अप्लिकेशन व इतर तांत्रिक बाबींचीही माहिती यावेळी शेतकर्‍यांना दिली. या अॅपवर लागवड, तंत्रज्ञान, आधुनिक शेती, वित्त पुरवठा, बाजार आदींची माहिती घर बसल्या मिळते. शेतकरी याद्वारे आपली शेती नफ्यात आणू शकतील. शेतीत बदल घडवू शकतील असे कृषिदूत मोहम्मद अब्दूलहुसेन बद्री यांनी सांगितले. कीड व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, पाणी, खतांचे व्यवस्थापन, बाजारभाव, तंत्रज्ञान या सर्वच बाबी शेतीसाठी महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने काम केले पाहिजे असे शेतकऱ्यांना सांगितले.
     यावेळी प्रगतिशील शेतकरी रमेश वेडुजी मराठे, सचिन चुडामन मराठे, अमृत रमण मराठे, मनोज सुदाम पाटील, भगवान तुकाराम मराठे, भूषण भिमराव मराठे, कैलास राजाराम मराठे, प्रमोद सदाशिव पटेल, गोमा पाडवी आदी शेतकर्‍यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी शहादा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, डॉ.ए.बी.पाटील, संदीप पाटील, सी.यु.पाटील, एम.ए.कोळी. व्ही.एन. पाटील आदी शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यातील लोंढरे येथे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Next Post

टपाल विमा एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

टपाल विमा एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add