नंदुरबार | प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे तालुक्यातील वासदरे येथे गरीब व होतकरु मुलांना खेळ साहित्य व मास्कचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय संस्था असून विविध सामाजोपयोगी कार्यात नेहमीच पुढाकार घेवून कार्य करते. त्याच अनुषंगाने नंदुरबार तालुक्यातील वासदरे या गावात राहत असलेले गरीब व होतकरु मुलांना खेळाचे साहित्य व मास्क वाटप करण्यात आले. प्रोजेक्ट चेअरमन आकाश जैन यांच्या नियोजनात हा कार्यक्रम घेण्यात आला. सद्या कोरोना विषाणुचा प्रसार जगभर पसरलेला आहे. कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानिमित्त खेळाचे साहित्यासोबतच मास्कचे देखील येथे वाटप करण्यात आले. यावेळी वासदरे ग्रामपंचायतीचे सरपंच जगन उत्तम वळवी व माजी सरपंच संतु मंसू भील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल शर्मा, फकरुद्दीन वोहरा, इसरार सैय्यद, राहुल पाटील, तसेच शिक्षक अकील शेख, दिनकर सावळे, वसुमती नेरे, शुभांगी माळी, यशवंत बोरसे आदी उपस्थित होते.