नंदुरबार | प्रतिनिधी
जुलै महिन्याच्या पहिला आठवडा लोटत असतांना वरुणराजाचे आगमन झालेले नाही. जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी डॉ. अभिजित दिलीपराव मोरे मित्र मंडळाच्या वतीने दंडपाणेश्वरच्या गणरायाला व इमाम बादशहांना साकडे घालण्यात आले आहे.
दि.७ जूनला पावसाला सुरुवात होत असते. परंतु,यंदा जुलैच्या पहिला आठवडा जवळ आला असताना देखील वरुणराजाने पाठ फिरवली आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात पावसाने मारलेली दडी यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. चांगला पाऊस येईल या अपेक्षेने शेतकर्यांनी यापूर्वीच शेतात पेरणी केलेली आहे.आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवलेले आहे.
आज गुरुवारी डॉ.अभिजीत मोरे मित्रमंडळातर्फे जोरदार पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी शहरातील दंडपाणेश्वरच्या गणरायाला महाआरती केली.तसेच सैय्यद अल्लाऊद्दीन इमाम बादशहा दर्ग्यावर चादर चढवून साकडे घालण्यात आले. यावेळी युवा नेते ऍड राऊ मोरे, नितीन जगताप, नायब कुरेशी, रवींद्र पाटील,पंकज पाटील ,लल्ला मराठे,कालु शहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.