नंदुरबार ! प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे . ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या (आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले . त्यामुळे आता भाजपच्या गिरीश महाजन,जयकुमार रावल यांच्यासह १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले .
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला . पण , बोलू दिलं नाही म्हणून भाजपचे आमदार तालिका अध्यक्षांसमोर येऊन जोरदार गोंधळ घातला . यावेळी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , अनिल परब यांची बैठक पार पडली . सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले . त्यानंतर भाजपचे १२ आमदार निलंबित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे . यात भाजपचे आमदार गिरीश महाजन ,जयकुमार रावल, अभिमन्यू पवार , आशिष शेलार , अतुल भातखळकर , संजय कुटे , पराग आळवणी , हरिष मारूती आप्पासह १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.