Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायत क्षेत्रात शंभर टक्के लसीकरण

team by team
June 21, 2021
in सामाजिक
0
जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायत क्षेत्रात शंभर टक्के लसीकरण

नंदुरबार | प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी गती देण्यासाठी प्रशासनातर्फे मोहिमस्तरावर प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत १५ ग्रामपंचायत क्षेत्रात ४५ वर्षांवरील १०० टक्के नागरीकांचे लसीकरण झाले आहे. त्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी जनजागृतीचे उपक्रम गावतपातळीवर राबविले आहेत. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचार्‍यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. या प्रयत्नांना चांगले यश येत असून लसीकरणाचे प्रमाणही वाढते आहे.
जिल्ह्यात ४५ वर्षावरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण, अजेपुर, बालआमराई, गुजरजांभोली, नवापूर तालुक्यातील वावडी, निमदर्डे, केलपाडा, सागाळी, गंगापूर , शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर, धडगाव तालुक्यातील अस्तंबा, धनाजे, सोन आणि तळोदा तालुक्यातील राणीपुर, जुने सेलिंगपुर या ग्रामपंचायतीचा समोवश आहे.तर २१ ग्रामपंचायतींमध्ये ४५ वर्षांवरील ९० टक्क्यापेक्षा अधिक नागरिकांचे  लसीकरण झाले आहे. या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील काळंबा, कोळदा, मांजरे, कार्ली, आसाणे, नाशिंदा, खैराळे, नवापूर तालुक्यातील बोकळझर, वराडीपाडा, खानापूर, निबोणी, शहादा तालुक्यातील मोहिदात.श, बामखेडा त.त., जयनगर, दोदवाडा, लोढरे, अंबापूर, बुढीगव्हाण, तळोदा तालुक्यातील लोभाणी, सतोणा तर अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
पंचेचाळीस वर्षांवरील २५ ते ९० टक्के नागरीकांचे लसीकरण झालेली ४०१ गावे असून २५ टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झालेले १११ गावे आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज दूर करुन नागरिकांना लसीकरणाबाबत आवाहन करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आदींचीदेखील मदत घेण्यात येत आहे. विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना लसीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी लसीकरणाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले  आहे. इतरही ग्रामपंचायतींनी १०० टक्के लसीकरण करून कोरोनावर नियंत्रण आणण्यात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

न्यायालयात दावा दाखल केल्याच्या कारणातून एकास तिघांची मारहाण

Next Post

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

Next Post
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add