नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार भालेर येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिवदर्शन विद्यालयातील माजी विद्यार्थिनी आरती गणेश पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, भालेरचे उपसरपंच गजानन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी मराठी हिंदी गाण्याचा तालावर नृत्य सादर केले. जलतरण सायकलींग भूगोल परीक्षेत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समिती संचालक दिनेश पाटील, भालेरचे उपसरपंच गजानन पाटील, तीसीचे सरपंच दिलीप पाटील, उपसरपंच बारकू पवार, नानाभाऊ पाटील,हंसराज पाटील, युवराज पाटील, तुकाराम पाटील,एस.टी. पाटील ,संतोष पाटील,राजकमल पाटील संजय पाटील,कनीलाल पाटील कमलेश पाटील,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.








