नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथे देशाचा ७७ वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. सालाबादाप्रमाणे दरवर्षी शाळेतील सूत्रसंचालन हे विद्यार्थी करत असतात..यावर्षी एक पाऊल पुढे टाकत चक्क इयत्ता चौथीची विद्यार्थीनी मानसी घनशाम मराठे या विद्यार्थिनी ने जापनीज भाषेमध्ये सूत्रसंचालन केले.
सुरुवातीला गावातून लेझीम व बँड पथक वर प्रभात फेरी काढण्यात आली यानंतर उमर्दे खुर्द गावातील विठ्ठल मंदिर चौकात शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादरीकरण केलं या गीतात विद्यार्थ्यांनी मनोरा सादर केला. यानंतर जिल्हा परिषद सेमी स्कूल उमर्दे खुर्द शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जापनीज भाषेमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या मानसी घनश्याम मराठे या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक निलेश चव्हाण, राजेंद्र वळवी, श्रीम.निकिता जाधव मॅडम व श्रीम. रजनीषा गावित यांनी प्रयत्न केले शाळेने केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले.








