नंदुरबार l प्रतिनिधी-
नैसर्गिक शत्रू कीटक, परभक्षी व परोपजीवी कीटकांचा वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे.” यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादनाची गुणवत्ता वाढते, असेही त्यांनी नमूद केले. नंदुरबार: रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘जैविक कीड नियंत्रण’ हाच शाश्वत पर्याय आहे. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते .
याच उद्देशाने शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे “शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण” (Bio-control for Sustainable Agriculture) या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख मार्गदर्शन व उपस्थिती: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. व्ही. के. खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस. बी. खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे आणि संशोधन संचालक डॉ. व्ही. एस. शिर्के यांचे या कार्यक्रमाला विशेष प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले होते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन:
सकाळच्या सत्रात तांत्रिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. यू. बी. होले यांनी स्पष्ट केले की,”नैसर्गिक शत्रू कीटक, परभक्षी व परोपजीवी कीटकांचा वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे.” यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादनाची गुणवत्ता वाढते, असेही त्यांनी नमूद केले.
शहादा येथील सहायक प्राध्यापक प्रा. के. एस. पाटील आणि दोंडाईचा येथील प्रा. आर. एस. साळुंखे यांनी अतिथी व्याख्याते म्हणून जैविक नियंत्रणाचे विविध पैलू उलगडून दाखवले. याप्रसंगी डॉ. डी. बी. सूर्यवंशी, डॉ. एस. एस. वाघ आणि डॉ. बी. पी. बिरारी यांनीही तांत्रिक सत्रात सहभागींना मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष प्रात्यक्षिके: दुपारच्या सत्रात सहभागींना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत नेऊन प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. के. व्ही. देशमुख यांनी ‘फुले ट्रायकोकार्ड’ तयार करण्याची शास्त्रीय प्रक्रिया आणि विविध बुरशीजन्य जैविक कीटकनाशकांची ओळख करून दिली. या प्रयोगात्मक सत्रामुळे विद्यार्थी आणि कृषी कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी, याची सखोल माहिती मिळाली.
आयोजन आणि आभार: कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक डॉ. एस. एस. वाघ व डॉ. के. व्ही. देशमुख यांनी केले. सह-समन्वयक म्हणून डॉ. डी. बी. सूर्यवंशी व डॉ. बी. पी. बिरारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. बी. सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. के. व्ही. देशमुख यांनी मानले. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








