नंदुरबार l प्रतिनिधी
युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे व बलबुद्धीसह शरीराला चालना मिळावी यासाठी आराळे ता.नंदुरबार येथील व्यायाम शाळेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत क्रीडाधिकारी कार्यालय मार्फत सर्वसाधारण योजनेचा माध्यमातून ७ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायामाकडे पाहिले जाते. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदतही होत असल्याची बाब लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या प्रयत्नातून आराळे गावात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून व्यायाम शाळेचे बांधकाम झाले.
व्यायाम शाळेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,जि.प माजी सभापती विक्रमसिंह वळवी,माजी जि.प सदस्य देवमन पवार,शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,माजी पं.स सदस्य संतोष धनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल गिरासे, भालेरचे उपसरपंच गजानन पाटील यांच्यासह गावातील युवक उपस्थित होते.








