नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मध्यवर्ती गणेश पेठ मंदिरात साई आर्ट इन्स्टिट्यूट तर्फे मुंबईतील फोर्टच्या राजाची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
या भव्य आकर्षक रांगोळीचे औपचारिक उद्घाटन मा. आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल 48 तास परिश्रम घेऊन साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या कलावंतांनी रांगोळी साकारली. याप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित यांनी ही कलाकृती साकारणारे गौरव माळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मन भरून कौतुक केले. महादू हिरणवाळे, महाराष्ट्र कर्मचारी महासंघाचे प्रदेश रणजीतसिंग राजपूत, माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे, लक्ष्मण माळी, आकाश चौधरी, संतोष वसईकर, उपस्थित होते.