श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी
23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी व अवकाशाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी श्रॉफ हायस्कूलमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत आर्यभट्ट नावाचा उपग्रह विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्यात आला.
एकूण 50 विद्यार्थ्यांनी हा उपग्रह बनवला.
हा उपग्रह बनवताना पुठ्याचा वापर करण्यात आला.
उपग्रह तयार करताना कागदाच्या घड्या घालने, कागद कापणे, चिकटवणे. असे अनेक कौशल्य विकसित होतात. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य सुषमा शहा मॅडम सुद्धा कार्यशाळेत सहभागी झाल्या. त्यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला गुण असतात परंतु त्या अशा माध्यमातून बाहेर येत असतात. आपल्या भारताचे अंतराळ शास्त्रज्ञ व त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. तसेच अतिशय किचकट काम करून विद्यार्थ्यांनी हा उपग्रह बनवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षक सीमा पाटील व भिकू त्रिवेदी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.अर्णव पाटील याने कार्यशाळेबद्दल व आर्यभट्ट ते गगनयान याबद्दल माहिती दिली.
कार्यशाळेच्या सुरुवातीला भूगोल शिक्षिका चेतना पाटील यांनी चंद्रयान 3 च्या यशस्वीतेबद्दल माहिती देत कार्यशाळेला सुरुवात केली.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी भूगोल शिक्षक कैलास वळवी, प्रशांत कासार,हिना ओझा, शीला पाटील, पल्लवी चव्हाण, मीना नंदवाळकर ,चेतना पाटील, भारती माळी, देविदास पाटील, प्रतिभा साळुंके,आशा राजपूत, मनीष सनेर,महादू गवळी यांनी परिश्रम घेतले.
तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून हेमचंद्र मराठे, विवेक राजपूत हे शिक्षक व विद्यार्थी शुभम, प्रथमेश, संस्कृती,तनिष्का, आरुषी, रोशनी, अर्णव, भावेश ,पुष्कर हे होते.