शनि अमावास्यानिमित्त श्री क्षेत्र शनिमांडळ येथे गावित परिवाराने घेतले दर्शन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना
नंदुरबार l प्रतिनिधी
शनि अमावसे निमित्त श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे शनि देवाचे दर्शन घेत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहपरिवार पूजन केले. अतिवृष्टी सारख्या संकटांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे तसेच शेतकऱ्यांना भरघोस शेती उत्पन्न मिळावे; अशी श्री शनि देवाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.
शनि अमावास्यानिमित्त नंदुरबार तालुक्यातील पावन श्री क्षेत्र शनिमांडळ येथे आज सकाळी ११ वाजता माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉ. हिनाताई गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी उपस्थित राहून शनि महाराजांचे विधिपूर्वक दर्शन घेतले.या पवित्र दिवशी त्यांनी जिल्ह्यातील सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे भरघोस उत्पादन, व वेळेवर पर्जन्यवृष्टी यासाठी शनि महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. यानंतर आरती व पूजन करत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.
या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, भास्कर आबा पाटील, क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी देखील श्रद्धेने पूजन व दर्शन करत संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले.श्री क्षेत्र शनिमांडळ येथे झालेला हा धार्मिक सोहळा भक्तांसाठी एक अनोखा अनुभव ठरला.