नंदुरबार l प्रतिनिधी-
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन वगळता आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 आणि 25 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केलेल्या अन्य क्रीडा स्पर्धा तुर्त स्थगित करण्यात आल्या असून त्या दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट 2025 रोजी ठरलेल्या ठिकाणी पार पडतील, असे विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीतर्फे कळविण्यात आले आहे.
रस्सीखेच, फुटबॉल आणि लंगडी या स्पर्धा 24/08/2025 व 25/08/2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या तथापि सतत चालू असलेल्या पावसामुळे आणि येत्या दोन दिवसात आणखी पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे बॅडमिंटन वगळता उर्वरित मैदानी स्पर्धा तुर्त थांबविण्यात आल्या आहेत. दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट रोजी या स्पर्धा ठरलेल्या ठिकाणी म्हणजे श्रॉफ हायस्कुल नंदुरबार, एस.ए. मिशन हायस्कुल नंदुरबार, जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे संपन्न होणार आहेत. परंतु नियोजित वेळेप्रमाणे बॅडमिंटन स्पर्धा उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथील दालनात पार पडेल. या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी आणि शाळा महाविद्यालय व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी असे आवाहन समितीने केले आहे.
बॅडमिंटन स्पर्धा: ठिकाण- जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार – गट 17 वर्षाआतील मुले – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. 17 वर्षा आतील मुली – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. गट 19 वर्षाआतील मुले – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. 19 वर्षा आतील मुली – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. संपर्क प्रमुख-भिकू त्रिवेदी (9226753077), राजेश शहा (9423191312).