नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार सारख्या अतिदुर्गम जिल्ह्याला अनेक समस्यांनी ग्रासले आहे . शासनाच्या आरोग्य सुविधांचा तुटवडा व मानव संसाधनांचा अभाव हा तर जिल्हयातील जनतेच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे . अशातच नंदुरबार जिल्ह्यात पहिली ऍन्जोग्राफी नंदुरबार शहरातील निम्स मेडीकेअर सर्जीकल डेंटल हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे . विशेष ऍन्जोग्राफीसोबतच निम्स हॉस्पिटलमध्ये कालच ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया केवळ १२ तासात करण्यात आल्याने रेकॉर्ड झाला आहे . निम्स मेडीकेअर सर्जिकल ऍण्ड डेंटल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गरीब रूग्णांसह इतर रुग्णांना विविध आजारांसह शस्त्रक्रिया करण्यात येत आहे .
नंदुरबार शहरातील निम्स मेडिकेअर सर्जिकल व डेंटल रुग्णालयाच्या टीम ने जिल्ह्यात प्रथमच कॅथ लॅब ची सुविधा उपलब्ध करून दिली व त्याचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी दि . १५ ऑक्टोबर २०२१ रोजी झाले व जनतेला आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न होत असलेला दिसून आला .
निम्स मेडीकेअर आणि सर्जिकल हॉस्पिटलने काल शस्त्रक्रियांच्या विशेष टप्पा गाठला आहे . महात्मा फुले जनआरोग्य योजनेतर्ंगत नंदुरबार जिल्ह्यातील तिघा रुग्णांवर पहिली ऍन्जोग्राफी करण्यात आली . डॉ . मनोज पटेल , डॉ . प्रसाद अंधारे यांनी ऍन्जोग्राफी केली . डॉ . मनोज पटेल व डॉ . प्रसाद अंधारे हे मुळचे नंदुरबार येथील आहेत . त्याच बरोबर केवळ १२ तासात ३० एन्डोस्कोपिक व युरो सर्जरी करण्यात आल्या . सदर शस्त्रक्रिया डॉ . प्रतिक्षीत महाजन व त्यांच्या पथकाने केल्या . १२ तासात नंदुरबार सारख्या जिल्ह्यात ३० युरो सर्जरी होणे म्हणजे हा एक रेकॉर्ड मानला जात आहे . डॉ . प्रतिक्षीत महाजन हे सुध्दा नंदुरबार येथील असुन त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत .
निम्स मेडीकेअर सर्जिकल ऍण्ड डेंटल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गरीब रूग्णांसह इतर रुग्णांना विविध आजारांसह शस्त्रक्रिया करण्यात येत आहे . नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात म्हणजे सामान्यांसोबत गरीब रुग्णांना निम्स हॉस्पिटल वरदान ठरत आहे . निम्स हॉस्पिटलचे निम्स मेडीकेअर सर्जिकल ऍण्ड डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ . राजेश वसावे , डॉ . शिरीष शिंदे , डॉ . सम्राज्ञी शिंदे , कै . डॉ . प्रेरणा राजेश वसावे यांच्या योग्य नियोजनामुळे निम्स हॉस्पिटलमध्ये मेट्रोसिटीत उपलब्ध असणार्या सुविधा नंदुरबार शहरात उपलब्ध झाल्या आहेत . विशेष म्हणजे ऍन्जोग्राफी आतापर्यंत धुळे , सुरत , जळगांव , नाशिक येथे उपलब्ध होती . परंतु आता नंदुरबार शहरातही उपलब्ध झाली आहे . कै . डॉ . प्रेरणा राजेश वसावे , डॉ . सम्राज्ञी शिंदे , डॉ . शिरीष शिंदे , डॉ . राजेश वसावे यांच्या अथक परिश्रमामुळे हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत . बोलताना सांगलीले .
पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराप फुले जन आरोग्य योजने अंतर्गत होणार असल्याची माहिती देखील डॉ . राजेश वसावे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली . आता आपल्या जिल्हयात बर्याच वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत म्हणून नंदुरबार परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे .