Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मॉडेल महाविद्यालयाची इमारत लवकरच उपयोगात आणणार : पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी

team by team
February 3, 2025
in राज्य
0
मॉडेल महाविद्यालयाची इमारत लवकरच उपयोगात आणणार : पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मॉडेल महाविद्यालयीन इमारतीचा लवकरच वापर सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नंदुरबारचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

नंदुरबार शहरालगतच्या जिल्हा कारागृहाजवळ सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ.विजय एल. माहेश्वरी, रजिस्टार डॉ. विनोद पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक कपिल सिंघल, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील,
कार्यकारी अभियंता (सा.बा.नंदुरबार) अंकुश पालवे, कनिष्ठ अभियंता आनंद गोसावी, कनिष्ठ अभियंता सुनिल नेमाडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश वळवी हे उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालय परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, वृक्षलागवड तसेच वसतीगृहासह अन्य सुविधांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी पुढाकार घेऊन आवश्यक त्या सुविधांचा आराखडा तयार करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी सुविधा विकसित करण्यावर भर देण्याबरोबरच महाविद्यालयाचा वापर सुरू होण्यापूर्वी मुख्य रस्त्यांशी जोडणी, वसतीगृह सुविधा, तसेच इमारतीतील आवश्यक सुधारणांसाठी उपाययोजना हाती घेण्याच्या सूचनाही श्री. रेड्डी यांनी प्रशासनाला दिल्या. या भव्य वास्तूचा लवकरात लवकर उपयोग सुरू करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात संबंधित विभागांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि विद्यापीठ प्रशासनातील पदाधिकारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सात कलमी कृती कार्यक्रमाने नागरिकांचे जीवन : सुलभ आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल : पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी

Next Post

जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्याने आजाराशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित संपर्क साधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add