नंदुरबार l प्रतिनिधी –
बांग्लादेशात हिंदूंवर धर्माच्या आधारावर अनन्वित जिहादी अत्याचार सुरू आहेत, ते अत्याचार थांबावेत यासाठी बांगलादेश हिंदू न्याय यात्रा म्हणून मुक मोर्चा नंदुरबार शहरात निघणार असून, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या मुक मोर्च्यात सर्व हिंदू बंधू भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी केले आहे. यावेळी विजय चौधरी यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व तमाम हिंदू बंधू भगिनींना या मूक मोर्चा सहभागी होऊन, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या ब्रीदवाक्याचा आधार घेऊन, सकल हिंदू समाजाला एकत्रित होऊन, बांगलादेशी मुसलमानांच्या विरोधात लढण्यासाठी मूक मोर्चात सहभागी होऊन, अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दहा डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे, नंदुरबार शहरातील मोठा मारुतीपासून सकाळी नऊ वाजता या मूक मोर्चाला सुरुवात होणार असुन मोठा मारुती – जळका बाजार – सोनार गल्ली – सोनार खुंट – गणपती मंदीर – शहीदा शिरीषकुमार स्मारक मार्गे नगरपालिका – अंधारे स्टॉप – होऊन छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात याचा समारोप होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी दिली आहे.