नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता आठवी ते दहावी च्या मुलींसाठी समर्थनम् ट्रस्ट- ओरॅकल कंपनीच्या आर्थिक साह्याने मुलींना वॉश किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास प्रकल्पाच्या हेड अमोधा मायकल मॅडम बेंगलोर नंदुरबार जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रतिक काटे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील , का.वि.प्र. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, संस्थेचे चंद्रशेखर पाटील, प्राचार्या सौ विद्या चव्हाण, पी.पी. बागुल पालक नाना चव्हाण, पर्यवेक्षक एम. बी .आहिरे उपस्थित होते. अमोधा मायकल मॅडम यांनी मुलींना किट वापर संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
किट विद्यार्थिनींसाठी व महिलांसाठी अतिशय उपयुक्त असून साधारणपणे हजार ते अकराशे रुपये किमती पर्यंत आहे. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयी काळजी घेण्याच्या सूचना केल्या. ट्रस्ट राबवीत असलेल्या विविध उपक्रम विविध शाळांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात निलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळेस एक्वागार्ड गार्ड(RO) दिले असून. स्वच्छता गृहासाठी मेंटनस मटेरियल ( टॉयलेट रिनिवल ) केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयी आवड निर्माण होण्यासाठी पुढील सत्रात प्रकल्प अंतर्गत सेमिनार आयोजित केले जाणार आहे, दिल्या जाणाऱ्या सुविधा विषयी माहिती सौ. चव्हाण यांनी दिली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय कौतुकास्पद असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री.पाटील यांनी सांगितले. प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशीसर यांनी केले.