Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आता मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला विश्वास

team by team
October 26, 2024
in राजकीय
0
आता मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला विश्वास

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

 

लोकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास यापुढेही चालू राहील आणि त्या कामाच्या बळावर निश्चितच आमचा विजय होणार आहे असे असून सुद्धा काही विरोधक नडायचं काम करतात. विकासाला प्राधान्य देणाऱ्या आमच्या राजकारणात आमच्या विरोधकांनी अडथळा आणण्याचे प्रयत्न कितीही केले तरी त्याचे परिणाम होणार नाही. मित्र पक्षातील जे विरोधक साथ देत नाही, त्यांना त्याची किंमत याच्या आधी मोजावी लागल्याचं आपण पाहिलं. तरीही त्यांनी त्यांची भूमिका तशीच चालू ठेवली तर त्यांना पुढील वाटचाल कठीण होऊन बसेल; असा टोला भाजपाचे तथा महायुतीचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावित यांनी लगावला.

 

 

 

 

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे तथा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कालच 24 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेचच त्यांनी धानोरा भागातील सुंदरदे, करणखेडा, नारायणपुर, फुलसरे, उमर्दे बुद्रुक गावांमध्ये संपर्क दौरा केला. त्यानंतर आज दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी पातोंडा गटातील पातोंडा, वाघोदा, रकासवाडा, घुली, धमडाई, पथराई, करजकुपे, लोणखेडा, अडची, नळवे खु., नळवे बु या गावांमध्ये संपर्क दौरा केला. मतदारांशी संपर्क साधून म्हणणे जाणून घेतले. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष जे एन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावित, युवराज पाटील यांच्यासह प्रत्येक गावातील सरपंच सरपंच आणि महायुती मधील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

या दरम्यान झालेल्या भाषणांमधून त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत झाला. दुर्दैवाने लोकांनी घाबरून त्यावेळेला चुकीचे मतदान केलं पण आता ते सावध झालेत. मी जो काही विकास करतोय त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. जवळजवळ 30 वर्षापासून सातत्याने जनता मला विश्वासाने निवडून देते आहे. या पुढच्या काळामध्ये मतदार फसणार नाही. काँग्रेसच्या भूलथापांना हसायचे नाही, ही भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.

 

 

 

 

 

त्यामुळे जे मागच्या काळामध्ये झालं ते होणार नाही आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की, आम्ही विकासावर मत मागत असल्यामुळे निश्चितपणाने कुठल्याही पक्षाचा कोणीही उमेदवार विरोधात उभा राहिला तरी विजय आमचाच होईल. आमच्या मित्र पक्षातील काही लोक विरोधात गेले. त्या विरोधकांना त्यांच्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागली जर त्यांनी पुन्हा तसे केले तर त्यांचा पुढील काळ कठीण राहू शकतो, असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. दरम्यान, विविध योजनांच्या माध्यमातून गाव विकासासाठी आणि वैयक्तिक लाभासाठी केलेल्या कामांचा उल्लेख देखील त्यांनी भाषणातून केला.

बातमी शेअर करा
Previous Post

मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत तसेच, मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री बंद राहणार, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Next Post

ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणार डॉ. मित्ताली सेठी

Next Post
ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणार डॉ. मित्ताली सेठी

ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणार डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add