नंदुरबार l प्रतिनिधी-
शिक्षक भारती संघटना नंदुरबार तर्फे नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांना मतदार नोंदणी अधिकारी (BLO) कामातून वगळणे बाबत निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी निवडणूक शाखा प्रमोद भामरे
यांना देण्यात आले.
RTE Act 2009 नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या करिता दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारण कामे व प्रत्यक्ष निवडणूक वगळता इतर विभागाची कोणतीही अशैक्षणिक काम देऊ नयेत या करिता शालेय शिक्षण विभागाने दि. २३ ऑगस्ट, २०२४ रोजी शासन आदेश पारित केला आहे.
सदर आदेशानुसार BLO हे काम देखील अशैक्षणिक असल्याचे नमुद केले आहे. सद्यपरिस्थितीमध्ये नंदुरबार जिल्हयात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असून विविध प्रकारचे गुणवत्ता विकास उपक्रम/ऑनलाईन कामे यामुळे शिक्षक त्रस्त असून शासन आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामातून शिक्षकांना तात्काळ मुक्त करावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, संघटक तुषार सोनवणे, करणसिंग चव्हाण,प्रवीण परदेशी, सुनील वानखेडे, तुषार कुवर, कमलेश पाटील , शशिकांत निकम, प्रकल्प भामरे, वृषाल पाटील, हरिश्चंद्र चौधरी,अशोक सोनार, नितेश नाथजोगी ,अमोल पाटील, निलेश चौधरी उपस्थित होते.