नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्यातील निसर्गपूजक आदिवासी कालाकुणबी हा बारामेघ (वरुणराजा) ची कृतज्ञता म्हणून निलीचाराय, वाघदेव, गावदेवती हे सण साजरा होईपर्यंत शेतातील नवीन फळे व भाज्यांचे सेवन करणे टाळले जाते. परंपरेनुसार मोलगीत हा गावदेवती उत्सव हजारो सातपुडावासियांच्या साक्षीने साजरा झाला असून आजपासून प्रत्येक कालाकुणबी (शेतकरी) नवीन फळे व भाज्यांच्या सेवनास सुरुवात करणार आहे.
गावदेवती हा सातपुड्यातील उत्सवांपैकी एक असून याला प्राचीन इतिहास आहे. असा हा दैवी उत्सव यंदाही मोलगीत साजरा झाला. खरं तर हा उत्सव बारामेघ (वरुणराजा), वाघदेव यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात आला. उत्सवाला शासकीय विश्रामगृह आवारातील जुन्या गावदेवाच्या ठिकाणाहून सुरुवात झाली. तेथे पुंजारा दमण्या वळवी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. उत्सवानिमित्त परिसरातून ६२ ढोलवादक व मालक आपापले ढोल घेऊन दाखल झाले होते. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असल्याने प्रथम हे वाद्य वाजवून उत्सवाला खरी सुरुवात झाली, तेथून ढोल वाजवत गावदेवती पूजनस्थळापर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली.
या पवित्र उत्सवासाठी १२ पाड्याच्या मोलगी गावातील ४० ज्येष्ठ व्यक्तींनी ९ दिवसांपूर्वी दुधाने आंघोळ करून पालनीस सुरुवात केली. त्यात माजी पोलीस पाटील रतनसिंग वसावे, पुंजारा नुरजी बाबा वसावे, माजी मंत्री तथा आमदार ॲड. के.सी.पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, माजी जि.प. सिताराम राऊत, वाण्या वळवी, प्रदीप वसावे, रामसिंग वसावे, बिज्या वसावे, धिरसिंग वसावे, विजय वसावे, मधुकर वसावे, रुपसिंग वसावे, करमसिंग पाडवी, पारता वसावे, वाड्या वसावे, गिंब्या वळवी, रामसिंग वसावे, चंद्रसिंग वसावे, रोता वळवी, विनय वसावे, कागड्या वसावे, ॲड सरदारसिंग वसावे, तडवी रामा गुरुजी यांच्यासह अन्य ज्येष्ठांचा समावेश होता.
उत्सवासाठी सागर वसावे, तुकाराम वसावे, रमेश वसावे, बाज्या वसावे, काल्या वसावे, दामा वसावे, कोचऱ्या वसावे, जेकमसिंग वसावे, तानाजी वसावे यांच्यासह सर्व गावबांधवांनी परिश्रम घेतले.
कडक आचारसंहितेत ज्येष्ठांची पालन
आदिवासी सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या मोलगी येथील ज्येष्ठ व्यक्तींनी या दैवी उपक्रमानिमित्त होणारी पालनी देखील अगदी कडकच पाळत आले. या गावदेवती पूजनापूर्वी सातपुड्यातील कुठल्याही घरात सागाचे पान घेतले नाही. गृहप्रमुख तथा कालाकुणबी मकई, काकडीसह अन्य फळे व भाज्यांचे सेवन करीत नव्हता. पालनी कालावधीत ज्येष्ठ व्यक्ती खाटावर बसणे, बाहेरचे खाणे, दगड फेकणे, पादत्राणे वापरणे व साग पानांचा स्पर्श अशा बाबी टाळत होता. अशी कडक पालनी पाळल्यानंतर
ढोल मालक-वादकांचा सत्कार
आदिवासी संस्कृतीचे प्रतीक ढोल हे वाद्य बहुतांश सण-उत्सवात वाजवला जातो. यंदाच्या गावदेवतीनिमित्त परिसरातून ६२ ढोल दाखल झाले होते. त्या ढोल मालक व वादकांचा गाव पंचायत व उत्सव समितीकडून सत्कार करण्यात आला.