नंदुरबार l प्रतिनिधी
शहरात दोन गटात झालेली जाळपोळ व दगडफेक निंदनीय असून, दोन्ही समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
नंदुरबार शहरात माळीवाडा, इलाही चौक, काळी मस्जिद व इतर काही भागांमध्ये दोन गटात दगडफेक व जाळपोळची घटना गुरुवारी घडली होती.शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही समाज गुण्या गोविंदाने आपले सण उत्सव साजरे करीत आलेले आहेत. दोन्ही समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून बंधूभाव जोपासावा असे आवाहन देखील रघुवंशी यांनी केले आहे.