नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली असून पोस्ट व्हायरल करून बदनामी करणाऱ्या विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात भाजपातर्फे तक्रार देण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची बदनामी करणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या विरोधात भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून बदनामीकारक मेसेज आणि फोटो व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात भाजपचे नेते सुभाष पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मंत्री.डॉ. विजयकुमार गावित यांची बदनामी करणाऱ्या के. टी.गावित यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुभाष पावरा यांच्या वतीने आली आहे.