नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी माळीवाडा परिसरात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी अजित पवार पक्षा तर्फ करण्यात आले.
शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना रोज वापरण्यात येणारे उपकरण अर्थात चष्मा, श्रवण यंत्र ,व्हील चेअर अश्या विविध वस्तू घेण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येणार आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीनेही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून 65 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या वतीने 3 हजार रुपये उपकरणे घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. शासनाच्या या योजनेची जनजागृती व्हावी व जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा रुग्णालय व राष्ट्रवादी पक्ष तसेच विशाल मोहन माळी मित्र परिवाराच्या वतीने नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिरात रुग्णांचे डोळे तपासण्यात येऊन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज भरण्यात आले.या शिबिरात जिल्हा रुग्णालयातील डॉ. एकता मावची, डॉ. रोहन गावित, डॉ एस एल चौरे, डॉ रत्नदीप दळवी यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली .
यावेळी माळीवाडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल मोहन माळी यांनी रुग्णांना अर्ज कशा प्रकारे भरावा यासाठी मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे ,शहराध्यक्ष मोहन रायभान माळी यांचे मार्गर्शन लाभले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुलाब माळी,छोटू माळी,जिवन माळी, विनोद माळी, विनोद पाटील, वीरेंद्र राजपूत, अमित कापडणे,मिर्झा आफिक बेग यांनी या आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो ज्येष्ठ महिला व पुरुषांची नेत्र तपासणी करण्यात आली.