Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारच्या अध्यक्षपदी मनोज गायकवाड तर सचिव म्हणून फादर टेनी परक्का यांची निवड

team by team
August 8, 2024
in सामाजिक
0
रोटरी क्लब ऑफ नंदुरबारच्या अध्यक्षपदी मनोज गायकवाड तर सचिव म्हणून फादर टेनी परक्का यांची निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नंदुरबार शाखेचा पदग्रहण समारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्ष म्हणून श्री मनोज गायकवाड तर सचिव म्हणून फादर टेनी यांची निवड करण्यात आली. सामाजिक सेवेत सातत्यपूर्ण अनोखी कामगिरी करणारी संघटना म्हणून जागतिक पातळीवर रोटरी क्लबची ओळख आहे.

नंदुरबार जिल्हा शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण व शपथ विधी सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, हे होते.त्यांनी आपल्या भाषणामध्ये रोटरीच्या सर्व सभासद व नवयुक्त अध्यक्ष सचिव यांना शुभेच्छा देत, मी ही रोटरीच्या सदस्य होतो रोटरीचे कार्य ही आपल्या मार्गदर्शनातून केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी नवनियुक्त अध्यक्ष लहान पणापासूनच सेवेच्या भावनेतून कार्य करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ .अभिजीत मोरे, माजी नगरसेवक मोहन माळी, जगन्नाथ माळी, शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी, मोंटू जैन, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राकेश जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन पदाधिकाऱ्यांना यावेळी रोटरीचे मानचिन्ह पदक नुतन पदाधिकाऱ्यांच्या शर्ट वर लावून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. हा सोहळा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अनिस शहा यांनी पार पाडला. मावळते जिल्हाध्यक्ष ॲड निलेश देसाई यांनी गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा सादर केला.
नूतन अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून पुढील वाटचालीचा परामर्श घेतला. समाजातील वंचितांना आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नूतन पदाधिकारी ॲड.सुशील गवळी, डॉ. विजय बडगुजर ,माजी नगरसेवक दिलीप बडगुजर, विजय गुरव, देवेंद्र उपासनीस, पीटर चिन्नाप्पा, केशव राजभोज, कमलेश जैन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.निर्मल गुजराती तर आभार रोटरीचे सचिव फादर टेनी परक्का यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील सोनार, दीपक जैन, पंकज पाठक, राजेंद्र कासार, पुजारा, कपिल अग्रवाल या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली

बातमी शेअर करा
Previous Post

रजाळेेच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र बसची मागणी

Next Post

संस्कृती आणि कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव नंदुरबारमध्ये : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add