नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात प्रकरणे,धनादेश अनादर झाल्याची प्रकरणे,कौटुबिक वाद प्रकरणे, व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व
बँका,श्रीराम फायन्सास,ईक्वीटस फायनान्स,व बी.एस.एन.एल. यांचे थकबाकीची 1665 प्रकरणे शनिवार 27 जुलै रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. यांत 6 कोटी 28 लाख 24 हजार 589 रुपये वसुल करण्यात आले.
जिल्हा न्यायालयातील लोकअदालतीत प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आशुतोष नि. करमरकर, जिल्हा न्यायाधीश-१ आर.जी.मलशेटटी, जिल्हा न्यायाधीश-2 एम.आर.नातू, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या.एस.टी.मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी अजित.ए. यादव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव महेंद्र ब.पाटील, वरिष्ठ स्तर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश आर.एन. गायकवाड, कनिष्ठ स्तर 2 रे सह दिवाणी न्या. ए.आर.कुलकर्णी, तसेच पैनल विधिज्ञ हे उपस्थित होते.
लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रभारी प्रबंधक डी. पी. सैंदाणे, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. प्रेमानंद इंद्रजित, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक जे.वाय. सानफ तसेच न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी सहकार्य केले. सदरच्या लोकन्यायालयात नंदुरबार जिल्हयातील प्रलंबित व दाखलपुर्व दोन्ही मिळुन संपुर्ण जिल्हयातुन एकुण 1665 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असुन सदर प्रकरणातुन एकुण रक्कम रु. 6,28,24,589/- ची तडजोड करण्यात आली.