Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याचे वारंवार हल्ले,गावात पसरली दहशत

team by team
July 30, 2024
in क्राईम
0
कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याचे वारंवार हल्ले,गावात पसरली दहशत

म्हसावद l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याने एका घरात घुसून बकऱ्यांवर हमला केला असून यात तीन बकऱ्या मेल्या आहेत तर एक बकरी बिबट्याने उचलुन नेली आहे. एका महिण्याच्या कालावधित बिबट्याने या वस्तीत आतापर्यंत सुमारे दहा बकऱ्या फस्त केल्या असून गावात दहशत पसरली आहे.

मृत बकऱ्यांचे पंचानामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कुसूमवाडा व कानडी शिवारार बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबटे आता गावात शिरुन पाळिव जनावरे मारु लागली आहेत. दि. २८ जुलै च्या रात्री बिबट्याने कुसूमवाडा गावातिल बंजारतांडा वस्तित प्रवेश करुन मुलचंद घासी राठोड यांच्या घरात बांधलेल्या बकऱ्यांवर हमला केला. यात तीन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे. मुलचंद राठोड यांचे कुटूंब मजुरी करतात. त्यांनी घरात काही बकऱ्या पाळल्या होत्या. बिबट्याने या बकऱ्या ठार केल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर हा नैसर्गिक आघात आहे. तालुका प्रशासना मार्फत या घटनेचा पंचनामा होऊन त्यांना नुकसान भरपाई वा शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच या भागात बिबट्यांचे वावर मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतकऱ्यांना शेतात जायला भीती वाटू लागली आहे. गत एक महिन्यात बिबट्यांनी अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. बंजारतांडा वस्तीतच सुमारे १० बकऱ्या या एका महिन्यात बिबट्याने फस्त केल्या आहेत. गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे.
घटनेची माहिती मिळताच शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांनी निर्देश दिल्याने वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सध्या जे चाललंय ते बिन बुडाचं राजकारण; मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी लगावला टोला

Next Post

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1665 प्रकरणे निकाली, सहा कोटी 28 लाख दंड वसूल

Next Post
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1665 प्रकरणे निकाली, सहा कोटी 28 लाख दंड वसूल

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1665 प्रकरणे निकाली, सहा कोटी 28 लाख दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add