नवापूर ! प्रतिनिधी
उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे कायमस्वरूपी
भूलतज्ञ व एम. डी. (मेडीसीन) डॉक्टर तसेच पूर्णकालीन, सोनाग्राफी,सी.टी. स्कॅन सुविधा तसेच रक्तपेढीची व्यवस्था करणे बाबत चे निवेदन विश्व हिन्दु परिषद व बजरंग दलातर्फे तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा हा शंभर टक्के आदिवासी बहुल जिल्हा असून उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे तालुक्यातील सर्व गोरगरीब जनता प्राथमिक उपचारापासून ते (बाळंतपण) मातृत्व उपचारासाठी येतात. मातृत्व उपचार (बाळंतपण) हे अनेकदा गुंतागुंतीचे होऊन गंभीर समस्या निर्माण होतात. त्याच प्रमाणे गरोदर माता व त्यांचे बाळाची वाढ तपासणी कामी सोनाग्राफीची व्यवस्था नसल्याने, खाजगी दवाखान्यात संपर्क करावा लागतो. त्यामुळे रुग्णास आर्थीक भुर्दंड सोसावा लागतो. तसचे अनेकदा सिजेरियन सारख्या प्रसंगी नेहमीच भूलतज्ञ व एम. डी.(मेडीसीन) डॉक्टरची आवश्यकता वारंवार पडत असते. अशा वेळेस पूर्णकालीन, कायमस्वरूपी भूलतज्ञ
व एम. डी. (मेडीसीन) डॉक्टर नसल्याकारणास्तव सदर रुग्णास अशा अवघड स्थितीत नंदुरबार जिल्हा
रुग्णालयात हलवावे लागते. तसेच गंभीर स्वरुपाच्या आजार लक्षात येण्याकरीता सी.टी. स्कॅन करणे अत्यंत महत्त्वाचे असते ती सुविधा आपल्या रुग्णालयात नाही. तसेच अनेक रुग्णास रक्ताची गरज भासल्यास रुग्णाच्या नातेवाईकांस नंदुरबार, व्यारा सारख्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. यामुळे रुग्णाचा नातेवाईकांना मानसिक त्रास तर होतोच शिवाय आर्थीक बोजा देखील पडत असतो.बहुतांश वेळा रुग्णास अथवा गरोदर मातेस नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवीणे जिकिरीचे व त्यांच्या जिवावर बेतेल अशी परिस्थिती निर्माण होते. परिणामी गोरगरीब जनतेकडे काहीही एक पर्याय नसल्याने आपल्या रुग्णास तसेच गरोदर मातेस खाजगी दवाखान्यात हलवावे लागते व त्यासाठी रुग्णांच्या
नातेवाईकांना मोठ्या रक्कमेच्या बंदोबस्त करावा लागत असून हया सगळया भुदंडाच्या त्या गोरगरीब
जनतेवर अधिक ताण पडतो.तरी नवापूर तालुक्यातील गोरगरीब आदिवासी जनतेची आरोग्याची सहानुभूती पूर्वक जाणीव ठेवून पूर्णकालीन व कायमस्वरूपी नवापूर मुक्कामी असणारे भुलतज्ञ तसेच एम. डी. (मेडोसोन)
डॉक्टरांसह नियुक्ती करुन सोनाग्राफी व सी. टी. स्कॅन सेंटरची कायमस्वरुपी उभारणी करण्यात यावी. तसेच नवापूर तालुक्यात सिकलसेलचे रुग्णांचे प्रमाण मोठया प्रमाणात असुन नेहमी रक्ताचा पुरवठा कमी पडतो. त्याअनुषंघाने कायमस्वरुपी व पूर्णकालीन रक्तपेढीची व्यवस्था झाल्यास रक्तदान करणाऱ्यांची संख्या देखील वाढेल व संकलीत होणाऱ्या रक्ताचा फायदा हा सिकलसेल रुग्णांसाठी निश्चीतच होईल.तरी आम्ही केलेल्या मागणीचा 15 दिवसांचा आत योग्य विचार न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी.असे निवेदना मध्ये म्हटले आहे. निवेदनावर विश्व हिन्दु परिषद व बजरंग दल चे निलेश देसाई ,जगदिश जयस्वाल, राजेश सोनी,डॉ. अमित मावची,आनंदराव वाघ,शामभाई गावीत, महेंद्र नेरकर,जिग्नेश पंचाल,पंकज हिंगु,रामभाई पाटील,संदिप दर्जी,प्रशांत ठाकरे आदीचा सह्या आहेत.