Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे, चिरडा, धनपूर लघु व दरा मध्यम प्रकल्प क्षेत्रातील गावांनी सतर्क रहावे

team by team
July 24, 2024
in राज्य
0
मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे, चिरडा, धनपूर लघु व दरा मध्यम प्रकल्प क्षेत्रातील गावांनी सतर्क रहावे

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील लघु पाटपंधारे प्रकल्प चिरडा, व मध्यम प्रकल्प दरा व तळोदा तालुक्यातील धनपुर या लघु प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले व धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे कार्यकारी अधिकारी हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार विभागांतर्गत असलेल्या शहादा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना चिरडा, या प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यास्थितीत पाणी पातळीत 121.00 मी. ची नोंद झाली आहे. या प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणी साठा झाल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे उमरी नाला काठावरील चिरडा, पिंप्राणे, तलावडी, मडकाणी, आमोदा, फत्तेपुर व इतर गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

तसेच शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी 309.20 मी. ची नोंद झाली आहे. प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणीसाठा झाला असून प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. त्यामुळे वाकी नदी काठावरील विरपुर, रामपुर, फत्तेपुर, शिरुड त. हवेली, कानडी त. हवेली, चिखली, ओरंगपुर, कोठली त. हवेली, परिवर्धा, वैजाली,नांदडे व इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

तसेच तळोदा तालुक्यातील धनपुर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असून सद्यास्थितीत पाणी पातळी 114.50 मी. ची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणी साठा झाला असुन प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे निझऱ्या नाला काठावरील गावे मोठा धनपुर, छोटा धनपुर, सावरपाडा, मोड व इतर गावांनी सतर्कतेने रहावे.

 

 

या क्षेत्रातील नदी व नाला पात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने पात्रात जावू नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख

Next Post

साहित्य भारतीची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित, अध्यक्षपदी संदीप चौधरी

Next Post
साहित्य भारतीची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित, अध्यक्षपदी संदीप चौधरी

साहित्य भारतीची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित, अध्यक्षपदी संदीप चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add