नंदूरबार l प्रतिनिधी
5 मे रोजी मातोश्रीवर नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचारासाठी परिपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश उद्धवसाहेब ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांनी दिले.
नंदुरबार जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी वचन दिले की सातपुडयातील आदिवासी बांधव अगदी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील.
शिवसैनिकांशी संवाद साधत असताना उध्दव ठाकरे यांनी विजय ब्राम्हणे यांची आवर्जून विचारपुस केली. ब्राम्हणे यांचा मुलगा कै. आदित्य विजय ब्राम्हणे यांस ह्यावर्षी मरणोत्तर प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
यावेळी उद्धवसाहेब ठाकरेंनी कै. आदित्यचा लहानभाऊ आरुष विजय ब्राम्हणे यांस आशीर्वाद दिले. या बैठकीस,नंदुरबार जिल्हाप्रमुख तथा शिक्षण व वित्त सभापती गणेश रूपसिंग पराडके सौ.मिनाक्षी गणेश पराडके व कन्या कु सारासह सहकुटुंब उपस्थित होते.
तसेच उपजिल्हाप्रमुख विजय ब्राम्हणे, तालुकाप्रमुख महेश पाडवी, उपतालुकाप्रमुख दिलीप पाडवी, उपतालुकाप्रमुख प्रताप पटले, पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी, सरपंच फलाई राकेश पावरा, सरपंच त्रिशूल सूरज पाडवी, सरपंच वेलखेडी रायसिंग पवार, सरपंच तेलखेडी सुरेश पावरा, युवासेना तालुकायुवाधिकारी मुकेश वळवी, उपसरपंच त्रिशूल, चालूसिंग वळवी,
उपसरपंच कात्रा संजय पाडवी, पिंटा वळवी, लालसिंग वळवी मगन पाडवी, किसन पावरा, ग्रा पं सदस्य दिलीप पराडके, ग्रा पं सदस्य शामा चौधरी, ग्रा पं सदस्य ठुमला पावरा, ग्रा पं सदस्य ईश्वर वसावे, ग्रा पं सदस्य गजेंद्र पावरा, ग्रा पं सदस्य तानाजी वसावे, जगदिश मोरे व चि. आरुष विजय ब्राम्हणे उपस्थित होते.








