नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाने घोषित केला असून, मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदान करता यावे यासाठी टपाली मतदान केंद्राची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना टपाली मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी मतदार सुलभता केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील 01-अक्कलकुवा, 02-शहादा, 03- नंदुरबार, 04-नवापूर या 4 तसेच धुळे जिल्ह्यातील 05-साक्री, 09-शिरपूर या 2 अशा एकूण 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना हक्क टपाली मतपत्रिकद्वारे बजावता यावा यासाठी 10, 11 व 12 मे 2024 पर्यंत सकाळी 9.00 वाजेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जुनी भुसंपादन शाखा, पहिला मजला, मा. अपर जिल्हाधिकारी यांचे दालनाच्या पश्चिमेकडील पुर्व पश्चिम हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे टपाली मतपत्रिकद्वारे मतदान करता येणार आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.