नंदुरबार l प्रतिनिधी
एका सर्व सामान्य कुटुबातील एक मुलगा आपल्या अंगभूत हुषारीने शिक्षणाच्या जोडीने जीवनात काही घडविण्याच्या जिद्दीने सर्व प्रतिकुलतांवर मात करून आपल्या गुणवंतांच्या जोरावर जेव्हा न्यायाधीश होतो. विशेष म्हणजे संपूर्ण धुळे जिल्ह्यातून मराठा समाजातील न्यायाधीश होण्याचा प्रथम मान अमोल पांडूरंग मराठे यांने पटकविलेला आहे.
दोंडाईचा येथील पांडूरंग आनंदा मराठे हा बाप हमाल तर आई सौ. अरूणाबाई हिने अहोरात्र शिलाई काम करून आपल्या अमोल व कमलेश या मुलांना उच्च शिक्षण देवून एकाला न्यायाधीश तर दुसऱ्याला कर निरिक्षक बनविले हे विशेष, अमोल मराठे हे सुरूवातीला न्यायालयात लिपीक म्हणून नोकरीला लागले होते. त्यांनी हे करीत असतांना लॉ ची पदवी संपादन केली तेथून प्रेरणा घेवून न्यायाधीश होण्याचे स्वप्न अंगी बाळगून स्वप्न सत्यात खरे ठरविले या दोघं काळे (मराठे) बंधूंचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
अमोल पांडूरंग मराठे यांनी दिवसरात्र मेहनत घेवून जी.एम. एफ. सी. ही स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना दिवाणी न्यायाधीश ‘क’ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून त्यांची निवड झाली.
न्यायाधीश झाल्याबद्दल अमोल मराठे यांचा नंदुरबारच्या येथील गोल्डन हेरिटेज सिटीत समजातरफे सत्कार करण्यात आला यावेळी पांडुरंग पोटे, कोकीळाबाई पोटे, महेश पोटे, अमोल मराठे यांचे वडील पांडुरंग मराठे, अरूणाबाई मराठे, पाणी पुरवठा निरीक्षक दोंडाईचा कमलेश मराठे, अॅड.राजेंद्र मोरे, आनंद पवार, विजय कुटे, योगेश पेटकर, रविंद्र शिंदे, पत्रकार हिरालाल मराठे, मंगलसिंग गिरासे, अविनाश पटेल, चेतन चौधरी आदी उपस्थित होते.