Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत नागसेन पेंढारकर यांची नियुक्ती

team by team
April 3, 2024
in राज्य
0
बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत नागसेन पेंढारकर यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत असते. बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने अध्यक्षपदी तर नंदुरबार जिल्ह्यातील नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांची कार्यकारिणी सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषदेची सर्वसाधारण बैठकीत पंचवार्षिक निवडणूक पुणे येथील हॉटेल आर्किडमध्ये पार पडली. या पंचवार्षिक निवडणूकीत अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने अध्यक्षपदी तर नंदुरबार जिल्ह्यातील नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांची कार्यकारिणी सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

बीड येथील दीपा क्षीरसागर उपाध्यक्षपदी, नाट्यनिर्माते-दिग्दर्शक राजू तुलालवार यांची कार्याध्यक्षपदी तर नगरचे सतीश लोटके यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून १७ जणांची बालरंगभूमी परिषदेची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. यात आपल्या खान्देशातील नंदुरबार येथील रंगकर्मी नागसेन पेंढारकर व जळगाव येथील रंगकर्मी योगेश शुक्ल यांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख सल्लागार म्हणून पाच दशकांपासून बालरंगभूमीवर कार्य करणारे प्रकाश पारखी (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.इतर निवडण्यात आलेल्या प्रतिनिधींमध्ये सहकार्यवाहपदी दिपाली शेळके (शिरुर), आसेफ शेख (छत्रपती संभाजीनगर), कार्यकारिणी सदस्यात ॲड.शैलेश गोजमगुंडे (लातूर), आनंद खरवस (सोलापूर), अनंत जोशी (अहमदनगर), वैदही चवरे सोईतकर (नागपूर), धनंजय जोशी (सांगली), आनंद जाधव (नाशिक), त्र्यंबक वडसकर (परभणी), नंदकिशोर जुवेकर (परभणी) यांचा समावेश आहे. सदर निवडणुकीकरिता निवडणुक अधिकारी म्हणून नरेश गडेकर (नागपूर) यांनी काम पाहिले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नीलम शिर्के-सावंत यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

यात दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये बाल रंगभूमीचे संमेलन घेऊन त्यात नाटयासह नृत्य, गायन, वादन या कार्यक्रमांसोबत मुलांना भावणाऱ्या सर्व रंगमंचीय कलाकृतींचा मोहत्सव भरवण्याची योजना आहे. बाल रंगभूमीवर कार्य करणाऱ्या रंगकर्मींचा सन्मान, लहान मुलांना प्रकाशयोजनेसारख्या विविध तांत्रिक बाबींची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित करणे, पालकांची मानसिकता ओळखून ती बदलण्यासाठी शिबिरे घेणे, बालनाट्य संस्थांना अनुदान मिळवून देणे, बालनाट्य प्रयोगांना नाटयगृहांमध्ये सर्वजनिक सुट्टीच्या तारखा मिळवून देण्यासाठी आग्रह धरणे. चित्रकला, हस्तकला, शिल्पकला या कलांची गोडी मुलांना लागावी यासाठी कार्यशाळा आणि महोत्सव भरविण्याचे कामही भविष्यात बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई केली असून 18 लाखांचा मद्यसाठा जप्त

Next Post

परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रणाली विकसित करण्यात यावी. -भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add