नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या ७९३.९५ कोटी रुपये (सातशे त्र्यान्नव कोटी पंच्यान्नव लक्ष फक्त) किंमतीच्या प्रथम सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. म्हणून या योजनेचा लाभ होणाऱ्या तापी काठावरच्या गावांच्या वतीने तापी बुराई जल संघर्ष समितीतर्फे दिनांक 20 मार्च 2024 रोजी प्रत्यक्ष भेटून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत असलेल्या या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच शिंदखेडा व साक्री मधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे नंदुरबार तालुकयातील निंभेल, कंद्र, होळतर्फ, रनाळे, हाठमोहीदा, कोपर्डी, आसाने, खोकराळे, घोटाणे, न्याहाली, बलदाने, भादवड, मांजरे, बहयाने, शनीमांडळ, तिलाली, नलावाडे इत्यादी गावांना एकुण ४ हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला तसेच शिंदखेडा व साक्री तालुक्यातील एकुण ३१०० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावून विहिरीची भूजल पातळी वाढ मदत होऊन शेतकत्यांचे जीवनमान उंचावेल. याच हेतूने आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा चालवला होता.
दरम्यान तापी बुराई जल संघर्ष समितीने सुद्धा काही महिन्यांपासून शासनाकडे मागणी लावून धरली होती व आंदोलन चालवले होते. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारला या आंदोलनाची दखल घ्यायला लावून अखेर प्रशासकीय मान्यता मिळवली दिनांक 16 मार्च 2024 रोजी त्याविषयी चा शासन निर्णय जाहीर करण्यात आला त्यामुळे तापी बुराई योजनेचे संबंधित गाव पट्ट्यात आनंद व्यक्त केला जात असून त्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तापी बुराई जल संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष तथा आसाणे ग्रामपंचायत चे सदस्य योगेश पाटील, कार्याध्यक्ष भास्कर पाटील यांनी आदिवासी विकास मंत्री नामदेव डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले.
तसेच योजने ला कार्यान्वित करण्यासाठी अधिकारी स्तरावर लवकरात लवकर कृती घडावी; याविषयीच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्याप्रसंगी शनिमंडळचे मुन्ना पाटील, रनाळे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शरद तांबोळी, रवींद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रवीण पाटील, रणवीर पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.