नंदुरबार l प्रतिनिधी
खा.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदूरबार येथे आली असता माजीमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. पद्माकर वळवी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.बुधवारी मुंबईत त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे.
नंदुरबार येथे काँग्रेसतर्फे खा.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदूरबार येथे आली होती.यावेळी देशातील काँग्रेसचे मोठे नेते जिल्हयात असताना माजीमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. पद्माकर वळवी यांनी मुंबई येथे भाजपा कार्यालयात
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.ब
माजीमंत्री पद्माकर वळवी हे गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून लांब दिसत होते. राहूल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवरही प्रदेशाचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्रमातही ते उपस्थित नव्हते. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात होती.
अखेर या चर्चाना पूर्ण विराम मिळणार आहे. बुधवारी ते आपल्या समर्थकांसह मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्यासाठी स्थानिक कार्यकर्तेही मुंबईकडे रवाना झाले आहेत.
भाजप नेत्यांच्या सूत्रानुसार हा सोहळा पुढील आठवड्यात होणार होता. तथापि बुधवारी भाजपचे प्रदेशचे सर्वच नेते मुंबईत असल्याने उद्याच हा सोहळा करण्याचे निश्चित झाले आहे. भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचे माहिती प्राप्त होत आहे.