नंदुरबार l प्रतिनिधी
येथील एस.ए.एम इंग्लिश मीडियम हायस्कूल नवीन इमारतींचे उद्घाटन समारंभ झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथींनी फित कापून नवीन वास्तूचे उद्घाटन केले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जे. एच. पठारे, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, संतोष देशपांडे, डाॅ. राजेश वसावे, संस्थेचे विश्वस्त प्रिन्सिपल नुतनवर्षा वळवी, मार्था सुतार, राजेश एफ्. वळवी, सुरेश जांभीलसा, ग्लॅडवीन जयकर, माजी अध्यक्ष रूपसिंग वळवी, शांताराम मरसाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता अहिरे, पर्यवेक्षक सॅबस्टीन जयकर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस. ए. शिरसाठ यांनी शाळेच्या आठवणी सांगीतल्या.
कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी यांनी वर्ष 1903 पासून शाळेच्या स्थापनेचा इतिहास सांगितला आणि संस्थेचा नावलौकिक असाच उंचावत रहावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
कार्यक्रमात सर्व माजी कर्मचारी मुख्याध्यापक एस. ए. शिरसाठ, संजय जाधव, जे. जे. शिंगारे तसेच शिक्षक शब्बीर कपाडिया, अशोक शिंपी, इनोसंट एलिस, नंदा जाधव यांचा शाल आणि स्मरण चिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच वास्तुविशारद मुजाहिद खान यांनादेखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका फरहाना शेख आणि आभार प्रदर्शन वीना वळवी यांनी केले