नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून नंदुरबार तालुका विधायक समितीच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाने प्रशिक्षण केंद्रासाठी महाविद्यालयात ‘कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागासोबत सामंजस्य करार केलेला आहे.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागासोबत कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय हे सामंजस्य करार करणारे जिल्ह्यात पहिलीच महाविद्यालय ठरले आहे.शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी उपस्थित युवांना रोजगार या विषयावर मार्गदर्शन केले.संस्थेचे चेअरमन तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन केले आहे.प्रसंगी संचालक ऍड.राम रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, संस्थेचे समन्वयक एम.एस रघुवंशी, पुष्पेंद्र रघुवंशी, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती वैशाली शेवाळे, हितेशकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते. पुष्पेंद्र रघुवंशी यांनी आभार व्यक्त केले.
सध्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.परंतु, युवकांना रोजगारा विषयी परिपूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांना संधीचा फायदा घेत येत नाहीये. जिल्ह्यातील अनेकानेक बेरोजगार मिळावा यासाठी महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
श्रीमती वैशाली शेवाळे,
प्राचार्य- औषध निर्माणशास्त्र, महाविद्यालय