शहादा l प्रतिनिधी
सीसीआय च्या अटी जाचक असल्याने सहसा शेतकरी सीसीआयला माल विकण्यास धजावत नाही. परंतु सीसीआयने रिजेक्ट केल्यावर परवानाधारक व्यापारी खरेदी करतात.मात्र खरेदीचे प्रथम प्राधान्य सीसीआयलाच दिले जाते. खरेदी केंद्रावर काही वाद उद्भवल्यास तात्काळ बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिवां मार्फत तो सोडवला जातो. शेतकरी बांधवांनी कुठल्याही प्रकारच्या संभ्रम मनात न ठेवता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा निश्चितपणे आपला माल चांगला दर्जाच्या असल्यास अधिकाधिक दर मिळेल काही समज गैरसमज असेल तर संचालक मंडळ किंवा बाजार समितीच्या सचिवांची संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे. सोमवारपासून कापूस खरेदी केंद्रावर पूर्ववत कापूस खरेदी सुरू होणार असून शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर मागील तीन दिवसापूर्वी वाद झाला होता आणि हमीभावाप्रमाणे कापसाची खरेदी झाली पाहिजे या दोन विषयावर या दोन्ही विषयांवर मोठ्या प्रमाणावर संभ्रम होता या दोन्ही विषयांवर जिल्हाधिकारी व डी डी आर कार्यालयात निवेदने पोहोचली होती. यासाठी या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी बाजार समिती तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभापती अभिजित पाटील, उपसभापती डॉ. सुरेश नाईक, संचालक जगदीश पाटील उपस्थित होते. यावेळी सभापती अभिजित पाटील म्हणाले, शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद झाल्यानंतर तात्काळ जीनर्स ला कारणे दाखवा नोटीस दिली. जोपर्यंत लेखी खुलासा येत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत संबंधित व्यापाऱ्याला सहभागी होता येणार नाही अशी नोटीस दिलेली आहे. हमी भावाच्या विषय होता त्याबाबत गेल्या दीड महिन्यापासून सीसीआयच्या माध्यमातून हमी भावाची खरेदी लिलाव केंद्रावर सुरू आहे. शेतकऱ्यांनी हमी भावाप्रमाणे आपला माल विकला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे माल विकायचा नसेल किंवा सीसीआयच्या अटी ज्याचक वाटत असतील असे शेतकरी जिनर्स कडे ओपन मार्केटमध्ये आपला माल विकत असतात .त्यांच्याकडूनही हमीभावापेक्षा कमी किमतीत विकला गेला तर शेतकऱ्यांकडून संमती पत्र लिहिले जाते जास्तीचा भाव असेल तर कुठल्याही प्रकारची अडवणूक शेतकऱ्याला होत नाही. शेतकरी बांधवांना आपला उत्पादित माल विकण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आपला माल विकायचा की दुसरीकडे न्यायच्या त्याचेही स्वातंत्र्य शेतकऱ्याला आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या संभ्रम न ठेवता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर कृषीमाल विक्रीसाठी आणावा निश्चितपणे आपला माल चांगला दर्जाच्या असल्यास अधिकाधिक दर मिळेल काही समज गैरसमज असेल तर शेतकरी बांधवांनी संचालक मंडळ किंवा बाजार समितीचे सचिव यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करून घेण्याचे आवाहन श्री पाटील यांनी केले.
सर्वाधिक कापूस खरेदी.
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर जिनर्सच्या माध्यमातून सर्वाधिक दीड लाख क्विंटल पर्यंत कापूस खरेदी झाली आहे.याउलट सीसीआय ची कापूस खरेदी कमी आहे.सीसीआय च्या जाचक अटींमुळे शेतकरी सहसा माल देण्यास धजावत नाहीत.कापसाच्या दर्जा पाहून जिनर्स हमी भावापेक्षा अधिक दरानेही खरेदी करत आहेत. बाजार समिती नेहमी शेतकरी बांधवांचा पाठीमागे भक्कम पणे उभी आहे.