Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या ई – कंटेंट निर्मिती कार्यशाळेत शिक्षकांचा सहभाग

team by team
February 9, 2024
in शैक्षणिक
0
नंदुरबारच्या ई – कंटेंट निर्मिती कार्यशाळेत शिक्षकांचा सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयोजित, दिक्षा ई-कंटेंट निर्मिती कार्यशाळेत जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला. अहमदनगर येथील नॉलेज ब्रिज फाउंडेशनचे भूषण कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे संचालन केले.

 

 

 

साध्या आणि सोप्या भाषेतील त्यांच्या संवादाने कार्यशाळेतील सहभागी शिक्षक मंत्रमुग्ध झाले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे दिनांक ७ व ८ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसात दिक्षा ई-कंटेंट निर्मिती कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी विशेष आमंत्रित प्रशिक्षक म्हणून अहमदनगर येथील नॉलेज ब्रिज फाऊंडेशन या संस्थेचे संचालक श्री. भूषण कुलकर्णी हे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

 

या कार्यशाळेत ए. आय. (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) चा वापर करुन डिजिटल लेसन प्लान व ट्रान्सस्क्रिप्टची निर्मिती, लॅपटॉप व पेन टॅब लो बजेट इंटरॅक्टिव यंत्रणा, गणित, विज्ञान, शिष्यवृत्ती यासारखे विषय शिकवण्यासाठी इंटरॅक्टिव यंत्रणेचा वापर, दर्जेदार पॉवर पॉइंट निर्मितीच्या महत्वाच्या टिप्स, कॅमेरासमोरील प्रभावी सादरीकरण, क्वालिटी व्हिडिओ शूट तंत्र, कॅमेरा + पॉवर पॉइंट (इंटरॅक्टिव) लाईव्ह मिक्सिंग व व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ निर्मितीसाठी क्रोमा आणि टेलिप्रॉम्प्टरचा वापर, व्हिडिओ एडिटिंग अश्या विविध विषयांवर सविस्तर प्रात्यक्षिकासह धडे देण्यात आले.

 

 

 

कार्यशाळेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मर्यादित शिक्षकांना प्रवेश तसेच कार्यशाळा ऐच्छिक स्वरुपाची म्हणजेच ज्यांना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे, अश्या शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येऊन प्रथम नोंदणी केलेल्या ८० शिक्षकांना कार्यशाळेसाठी लॅपटॉप घेऊन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आय टी विभागप्रमुख अधिव्याख्याता विनोद लवांडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

 

 

जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्यासह शिक्षण विभागाचे या कार्यशाळेसाठी सहकार्य लाभले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वनमाला पवार, डॉ. बाबासाहेब बडे, प्रदीप पाटील, सुभाष वसावे, विषय सहायक देवेंद्र बोरसे यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी जबाबदारी पार पाडली.

 

 

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सहभागी शिक्षकांनी नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या या संधीबद्दल आभार व्यक्त करून; जिल्ह्यातील इतर शिक्षकांसाठी पुन्हा अश्याच प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्याची व सर्वांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. कार्यशाळेला गोविंद वाडीले व विशाल पाटील या शिक्षकांनी प्रशिक्षण सहायक म्हणून काम पाहिले. सुत्रसंचलन देवेंद्र बोरसे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते शिंदवाणी केंद्रातील क्रीडास्पर्धांचे उदघाटन

Next Post

म्हसावद पोलीसांनी एक लाखाचा गुटखा केला जप्त, एकास अटक

Next Post
म्हसावद पोलीसांनी एक लाखाचा गुटखा केला जप्त, एकास अटक

म्हसावद पोलीसांनी एक लाखाचा गुटखा केला जप्त, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add