नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील शिंदवाणी केंद्रातील केंद्रस्तरीय शालेय क्रीडास्पर्धा नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
सविस्तर वृत्त असे की शिंदवाणी ता.धडगाव गटातील केंद्रस्तरीय शालेय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.स्पर्धेचे उदघाटन गणेश पराडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी झालेल्या क्रीडास्पर्धेत खो-खो मध्ये जि.प.शाळा पाटीलपाडा त्रिशूलच्या मुला मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तर कबड्डीत जि.प.शाळा त्रिशूलने प्रथम क्रमांक प्राप्त केला. केंद्र शाळा शिंदवाणीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.तृतीय क्रमांक जि.प.शाळा निहानिकामोदने प्राप्त केला. धावणे प्रकारात अनुक्रमे, जलबी चेरमल वसावे, रिया विलास वळवी ,सेवी बोलज्या पावरा , यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुलांमध्ये अनुक्रमे सुरेश रूपा पाडवी , प्रवीण खात्र्या वळवी , दिलीप रमेश वसावे यांनी प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.
पंच म्हणून सचिन मानमोडे, वनसिंग वसावे यांनी काम पाहिले.सर्व यशस्वितांचे केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख दिनेश तडवी यांनी अभिनंदन केले. त्रिशूल गावाचे सामाजिक कार्यकर्ते सुरेशदादा , नमा वळवी व शिक्षक , विध्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार विश्वास वळवी यांनी मानले.